बँक खासगीकरण भूमिकेच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाचा आज शुक्रवारी दुसरा दिवस होता. शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमधील अधिकारी, कर्मचारी संघटनांनी शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाजवळ निदर्शने केली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या या संपात गुरुवारी देशभरातील नऊ लाख बँक अधिकारी, कर्मचारी, तर महाराष्ट्रातील दहा हजार शाखांत कार्यरत ५० हजार अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठीच संप पुकारला आहे, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स महाराष्ट्रचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिली. ही लढाई आणखी तीव्र होणार होणार आहे , स्टेट बँक, कोषागार शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करणार असल्याचे संघटनेचे शैलेश टिळेकर, दीपक पाटील, नीलेश वरपे यांनी सांगितले.