२९ जून २०२१,
भारतात करोना विषाणू संक्रमणाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यादरम्यान देशाला आणखीन एक खुशखबरी मिळालीय. ‘मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात परवानगी देण्यात आलीय’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
याअगोदर ‘सिप्ला’ला मॉडर्ना लशीच्या आयातीसाठी ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची (DCGI) मंजुरी मिळालीय. मंगळवारी सरकारकडून याची घोषणा करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासित करण्यात आलेली पहिली लस ‘मॉडर्ना’ला भारतात परवाना (न्यू ड्रग परमिशन) मिळालाय. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासित करण्यात आलेली पहिली लस ‘मॉडर्ना’ला भारतात परवाना (न्यू ड्रग परमिशन) मिळालाय. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना यांचा समावेश आहे.