Friday, September 20, 2024
Homeताजी बातमीEmergency alert : Severe : तुम्हालाही असे मेसेज येत आहेत का? जाणून...

Emergency alert : Severe : तुम्हालाही असे मेसेज येत आहेत का? जाणून घ्या, काय आहे हा प्रकार

राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या मोबाईलवर आज (20 जुलै) सकाळपासून एक विशिष्ट प्रकारचा अलर्ट मेसेज येत आहे. याशिवाय मोबाईल खूप जोरात व्हायब्रेट होत असून व्हॉइस नोटिफिकेशन देत आहे. यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. मोबाईल हॅक होण्याचा तर हा प्रकार नाही ना? हा मेसेज नेमका काय आहे, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

Emergency alert : Severe. This is test alert from Department of Telecommunications, government of india. 20-07-2023 असा इंग्लिशमध्ये तर “हा भारत सरकारच्या दुरसंचार विभागाकडून एक चाचणीचा इशारा आहे. 20-07-2023” असा मराठीमध्ये अलर्ट मेसेज डिसप्ले होत आहे.

नेमका काय आहे हा मेसेज?

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भारत सरकारचा एक चाचणी उपक्रम आहे. भारत सरकारने मोबाईल फोनवर विशिष्ट स्थानांवर काही आपत्कालीन सूचना पाठवण्यासाठी मोबाईल अलर्ट सिस्टम (MAS) लागू केली आहे. प्रामुख्याने चक्रीवादळ, भूकंप आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी ही यंत्रणा वापरली जाणार असल्याची माहिती आहे. (the government of india has implemented the Mobile Alert System (MAS) to send location-specific emergency alerts to mobile phones)

लोकांना अशा घटनांबाबत अलर्ट करता यावे, धोक्याच्या परिस्थितीबद्दल पूर्वकल्पना देता यावी यासाठी हा प्रयोग केला जात आहे. आज फक्त जियो सीम कार्ड वापरत असलेल्या मोबाईलधारकांना असा अलर्ट मेसेज आला आहे. यात घाबरुन जाण्यासारखे काहीही नसल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, यापूर्वी युनायटेड किंगडममध्येही असा प्रयोग झाला असल्याची माहिती आहे. मार्च/एप्रिल 2023 मध्ये वायरलेस अॅलर्टची त्यांनी पहिली चाचणी घेतली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments