एलाॅन मस्क ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. त्यांनी एक ट्विट करुन नव्या लोगोचे डिझाईन मागितले होते. त्यानुसार आजपासून हा नवा बदल दिसत आहे.
ट्विटरसाठी बदल आता सामान्य झाले आहेत. एलाॅन मस्क वेळोवेळी प्लॅटफॉर्ममध्ये काही बदल करत राहतात. अलीकडे फ्री यूजर्ससाठी डीएम लिमिट लावली आहे. जेणेकरुन बाॅट आणि स्पॅमवर नियंत्रण ठेवले जाईल. त्यानंतर फ्री यूजर्स एका मर्यादेपर्यंत इतर यूजर्सना मेसेज पाठवू शकतील. यादरम्यान रविवारी एलाॅन मस्कने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानुसार मस्कने ट्विटरचा लोगो बददला आहे.
एलन मस्कने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, लवकरच आम्ही ट्विटरच्या चिमणीला गुड बाय म्हणणार आहे. जर आज रात्रीपर्यंत एखादा चांगला लोगो पोस्ट झाला तर उद्यापासून तो लाईव्ह केला जाईल. याचाच अर्थ तो ट्विटरचा नवीन लोगो ठरणार आहे.
कसा असेल नवीन लोगो
ट्विटरचा नवीन लोगो एक्स असेल. कारण मस्कला एक्स हे अक्षर खूप आवडते. त्यांनी सर्वच कंपन्यांच्या नावात एक्स चा वापर केला आहे. त्यामुळे ट्विटरलाही आता एक्स नावाने ओळखले जाईल.
असा असेल व्हिडिओ
एलाॅन मस्कनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक्स दिसत आहे. त्यांनी यूजर्सना एक मस्त X लोगो शेअर करण्यास सांगितले आहे. मस्कला हा लोगो आवडला असल्याने त्याने तो शेअर केल्याचे दिसते. हा लोगो SawyerMerritt नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे.