Wednesday, December 6, 2023
Homeताजी बातमीनिवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केली मतदान केंद्रांची तपासणी…

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी केली मतदान केंद्रांची तपासणी…

२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी या मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन केंद्रांची तपासणी केली.

मतदान सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आवश्यक सुविधा आणि रचना याबाबत श्री.सत्यनारायण यांनी संबंधित अधिकारी आणि समन्वयकांना मार्गदर्शन केले. गतमतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागात विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पोरेडी, समन्वयक थॉमस नरोन्हा, उत्तम भारती, अशोक कुटे यांच्यासह संबंधीत सेक्टर अधिकारी उपस्थित होते.

तपासणी केलेल्या केंद्रांमध्ये मामुर्डी येथील सेंट जॉर्ज इंग्लिश मिडीयम स्कूल, किवळे येथील विद्या भुवन स्कूल, विकासनगर, भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळा आणि दिवंगत मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, पुनावळे येथील महापालिका शाळा, चिंचवडगाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा आणि मरहूम फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय, थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व महापालिका शाळा तसेच जी.के. गुरुकुल, पिंपळे निलख येथील महापालिका शाळा , पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा आणि विशालनगर येथील विद्याविनय निकेतन शाळा या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments