पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवण्यात आला आहे. कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणत विनयभंग करण्यात आला. महिलेच्या नावाने मेल गेल्याचे महिलेला कळाल्यानंतर या प्रकरणी महिलेने तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून एका व्यक्तीच्या पत्नीचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला. “जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, आज चालायला आली नाही का”, असा ई- मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून दिला. महिलेला आणि तिच्या पतीला ही बाब समजल्यानंर महिला आणि तिचा पती या संदर्भात जाब विचारण्यास गेले. जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावले. सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून सभासदांना ई-मेल करुन महिलेची बदनामी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी शेखर बाबुलाल धोत्रे ( रा. कडनगर, उंड्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी धोत्रे एकाच सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर धोत्रे याने सोसायटीतील १४० सभासदांना महिलेविषयी बदनानीकारक मजूकर इमेलद्वारे पाठविला होता.पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.