Sunday, November 10, 2024
Homeताजी बातमीएकनाथ शिंदेंनी रिलीज केला बाळासाहेबांच्या आवाजातील दसरा मेळाव्याचा टीझर…

एकनाथ शिंदेंनी रिलीज केला बाळासाहेबांच्या आवाजातील दसरा मेळाव्याचा टीझर…

शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेला पहिला दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांकडूनही प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे. एकाच दिवशी होत असलेल्या या मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करत ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न दोन्ही गटांचा असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आपल्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून रिलीज करण्यात आलेल्या पहिल्या टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे. ‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कशी सुरू आहे तयारी?

शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदाने आरक्षित करण्यात आली आहेत. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ अशा एकनात सूचना शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,’ असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी काल झालेल्या बैठकीत केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments