सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई. हे शिखर सर करण्याचे कोणत्याही ट्रेकर्सचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील स्वप्न असते. हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सचीदेखील चांगलीच दमछाक होते. मात्र, महापौर माई ढोरे यांचा नातू व जे डी ट्रेकर्सचा सभासद अव्दैत भुषण शिंदे याने आठव्या वर्षी कळसुबाई शिखर अवघ्या ३ तास १७ मिनिटांत सर करण्याची किमया केली आहे. त्यासोबत अवधुत तानाजी भोंडवे वय १५ वर्ष याने ही कळसूबाई शिखर सर केले आहे.
वडिलांकडून बाळकडू
ट्रेकर ची आवड असलेला अव्दैत शिंदे याला वडील भुषण शिंदे यांच्याकडून ट्रेकिंकचे बाळकडू मिळालेले आहे. अवघ्या आठव्या वर्षी केलेल्य या कामगिरीचे आणि खासकरुन त्यांनी दाखविलेल्या साहसाचे, जिद्दीचे सोशल मीडियावरून ट्रेकर्सकडून कौतुक केले जात आहे. भविष्यात कळसुबाई शिखराहून जास्त उंचीचे ट्रेक करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
जे डी ट्रेकर्स चे बाल सभासद त्याचप्रमाणे गणेश वाजे,महेंन्द्र कुदळे,भूषण शिंदे,केतन कुंजीर,ओंकार स्वामी,मंगेश कोद्रे,राजेश ढोरे,पप्पुशेठ ससार,मयूर पातुरडे,रुत्विक बाळासाहेब लावरे,महापौर माई ढोरे व जे डी ट्रेकर्स चे मार्गदर्शक जवाहर ढोरे यांनी अव्दैत व अवधुत तसेच सर्वांनचे कौतुक करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.