२७ नोव्हेंबर २०२०,
औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या आय. आय. सी.एम.आर.(एम.सी. ए.) ,निगडी (IICMR)आणि होप फौंडेशनच्या , इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी (I2IT), पुणे यांच्यात 25 नोव्हेंबर रोजी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन विकास आणि परस्पर आधारावर ज्ञान, सामायिकरणात सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कराराची मदत होणार आहे .
आय. आय. सी.एम.आर.(एम.सी. ए.) च्या वतीने संचालिका डॉ. दीपाली सवाई आणि इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिच्या प्राचार्या डॉ . वैशाली पाटील यांनी या कराराचा विद्यार्थी वर्ग व प्राध्यापक वर्ग यांना कसा उपयोग होणार आहे याबद्दल सांगितले.
आय. आय. सी.एम.आर.(एम.सी. ए.) च्या वतीने संचालिका डॉ. दीपाली सवाई व रिसर्च हेड डॉ.प्रिया देशपांडे यांनी तर इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिच्या वतीने डॉ . वैशाली पाटील , प्रिन्सिपॉल व डॉ . शशिकला मिश्रा , कॉम्पुटर इंजिनीरिंग – विभाग प्रमुख, यांनी ह्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि चे प्रो .बैईलप्पा भोवी -AWS, ॲमेझॉन वेब वेब सर्विसेस एज्युकेटर व आय. आय. सी.एम.आर., निगडीचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ .प्रिया देशपांडेआणि आभार प्रदर्शन एम.सी. ए. विभाग प्रमुख रेणू मॅथ्यु यांनी केले .