सामाजिक कार्यकर्ते अनिल सौंदडे यांच्या संकल्पनेतुन ” सलग पंचाहत्तर दिवस लहुवंदना,बुद्ध वंदना,व शिववंदनेचे नित्य पठन”
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सामाजिक कार्यकर्ते अनिल सौंदडे यांच्या संकल्पनेतुन ‘ सलग पंचाहत्तर दिवस लहुवंदना,बुद्ध वंदना,व शिववंदनेचे नित्य पठन ‘ या उपक्रमाची सुरवात, स्वातंत्र लढयातील अग्रणी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती दिनी काल दि.१७ फेब्रुवारी २०२२ पासून पिंपरी चिंचवड शहारातील भोसरी लांडेवाडी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारी मंडल सदस्य माननीय श्री हेमंतराव हरहरे त्याच प्रमाणे पुणे विभागाचे समरसता संयोजक माननीय श्री विलास जी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु केली.
याप्रसंगी मा.हेमंतराव हरहरे म्हणाले की महापुरुषांच्या स्वप्नातला उन्नत समाज घडविण्यासाठी महापूरुषांचे विचार आत्मसात करुन शिक्षणाला संस्काराची जोड देणे गरजेचे आहे. उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल सौंदडे यांनी सुरु केलेल्या सलग पंचाहत्तर दिवस बुद्ध वंदना, शिववंदना व लहु वंदनेचे नित्य पठन हा त्यातलाच एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून महामानवांचे विचार अंगिकारन्याचा तरुण पिढीवर चांगला संस्कार होईल. मा.विलासराव लांडगे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणाची कास धरुन सदगुणांच्या संगतीत राहाण्याचे आवाहन केले तर सामाजिक गीतकार आसराम कसबे यांनी सामुहिक लहुवंदना म्हंटली.
यावेळी मोठ्या संख्येनी महिला व तरुण उपस्थीत होते.सुत्रसंचलन तानाजी साठे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंडीत जाधव,अक्षयभाऊ दुनघव, शांताबाई चव्हाण, महेश खिलारे,योगेश लोंढे,शिवाजी पौळ यांनी परिश्रम घेतले.


