Thursday, February 6, 2025
Homeगुन्हेगारीहसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी…

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी…

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केलं आहे.माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरी यापूर्वीही आयकर आणि ईडीचे छापे पडले आहेत.त्यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.

काय म्हणाले हसन मुश्रीफ.. ?
“माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले.

पुढे बोलताना, “दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन”, असेही ते म्हणाले.

“चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या म्हणतात अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments