पनामा पेपर्स लीक प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज ईडीसमोर हजर झाली. ईडीने तिला समन्स बजावले होते, त्यानंतर ऐश्वर्या दिल्लीत ईडीच्या मुख्यालयात पोहोचली. ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे, असं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याआधीही ऐश्वर्या रायने दोन वेळा ईडीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती.
पनामा पेपर्समध्ये जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची माहिती आहे. ज्यांनी फसवणूक आणि करचोरी केली आहे. हे लीक झालेले दस्तऐवज प्रथम Suddeutsche Zeitung या जर्मन वृत्तपत्राने मिळवले होते. अशी सुमारे १२००० कागदपत्रे आहेत, जी भारतीयांशी संबंधित आहेत. याआधी २०१६ मध्येही Mossack Fonseca ची कागदपत्रे लीक झाली होती. ज्यामध्ये ५०० हून अधिक भारतीयांची नावे होती.
एकीकडे ऐश्वर्या रायची ईडीकडून चौकशी होतेय. दुसरीकडे, ऐश्वर्याची सासू म्हणजे अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जय बच्चन जया राज्यसभेत आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या. यावेळी सत्ताधारी नेते आणि जय बच्चान यांच्या शाब्दीक चकमक उडाली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज ५ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. ‘तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील’, असा शाप जया बच्चन यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १२ खासदारांच्या निलंबनावरून त्या बोलत होत्या.