Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वशिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’कडून अनिल भोसलेंसह चौघांना अटक

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’कडून अनिल भोसलेंसह चौघांना अटक

९मार्च २०२१,
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बँकेचे संचालक आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह चौघांना अटक केली.

याप्रकरणी बँकेचे संचालक आमदार अनिल शिवाजीराव भोसले, संचालक सूर्याजी पांडुरंग पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले यांना अटक करण्यात आली.

गैरव्यवहार प्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची ‘ईडी’ कडून चौकशी करण्यात येत होती. ‘ईडी’ च्या पथकाने १५ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील वाकडेवाडी परिसरात असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता.

ईडीकडून या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या पथकाकडून छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी २०२० मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भोसले, पडवळ, जाधव यांना अटक केली होती. या कारवाईत भोसले यांच्या महागडय़ा मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments