Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीमावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून श्री. सुधांशू राय यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता कक्ष क्रमांक ए-२०१, व्हीव्हीआयपी विश्रामगृह , क्वीन्स गार्डन, पुणे असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९०२२६९०६६७ व ईमेल expobs33maval@gmail.com असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. सचिन चाटे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१२७९५६६ असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक मावळ लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ मंगळवार व शुक्रवार सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही मावळ लोकसभा मतदार संघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments