३० सप्टेंबर २०२१,
प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्रात वाढ, ई वाहनांचा उपयोग अशा उपायांद्वारे २०३० पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे पर्यावरणपूरक म्हणून ओळखले जाण्यासाठी २०३०पर्यंत अक्षय्य ऊर्जेचे ९० टक्के एकत्रिकरण करण्यात येणार असून, सिंहगडावर लवकरच ई बससेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली.
‘कार्बन न्यूट्रल’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह झालेल्या आढावा बैठकीत राव यांनी पुणे विभागाने के लेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण के ले. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे महानगरपालिके चे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, अभियान संचालक सुधाकर बोबडे, उपायुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते