Friday, October 4, 2024
Homeताजी बातमीनिवडणूक नाकाबंदी दरम्यान वाकड उड्डाणपुलाखाली २७ लाखांची रोकड पकडली

निवडणूक नाकाबंदी दरम्यान वाकड उड्डाणपुलाखाली २७ लाखांची रोकड पकडली

नाकाबंदी दरम्यान निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम वाकड उड्डाणपुलाखाली २७ पकडली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मतदार संघात राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यात नाकाबंदी करण्यात येत आहे.

निवडणूक विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी गाडी येत होती. पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत रोकड मिळून आली. गाडीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत असून त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत माहिती देता आली नसल्याने या व्यक्तीची रोकड आणि गाडी जप्त करण्यात आली आहे.पिंपरी- चिंचवड पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला घटनास्थळी पाचारण केले.याबाबत चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments