Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीभाजपच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली; टेंडर किंग, लुटारू टोळ्यांचा सुळसुळाट –...

भाजपच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली; टेंडर किंग, लुटारू टोळ्यांचा सुळसुळाट – अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून शहरात ‘टेंडर किंग’ आणि लुटारूंच्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. २०१७ पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेवी सुमारे ४८४४ कोटी रुपयांपर्यंत होत्या. मात्र आज त्या घटून अवघ्या २००० कोटींवर आल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या असताना उलट कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज घेण्यात आले. “इतका पैसा खर्च केला, तर विकासकामे कुठे दिसतात?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजपच्या काळात रिंग करून पैशांची लूट करण्यात आल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले की, रस्ते अरुंद केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढली आहे. “आमच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये सुसाट प्रवास होत होता, नियोजनबद्ध विकास दिसत होता,” असे ते म्हणाले.

२०१७ साली मोदी लाटेमुळे सत्ता गेली, मात्र १९९२ ते २०१७ या कालावधीत आपण पिंपरी-चिंचवडचा कायापालट केल्याचा दावा अजित पवार यांनी केला. विठ्ठल मूर्ती घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, त्या काळात ज्या महापौरांच्या कार्यकाळात हा प्रकार झाला, तेच महापौर आज भाजपमध्ये आहेत आणि आमच्या विरोधात लढत आहेत.

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत पवार साहेबांचे कौतुक केले. “राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहराला विकासाची दिशा मिळाली,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments