पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने मुंढवा येथून एका महिलेसह चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 46 लाख 59 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडवा परिसरात एक महिला आणि एक व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सागर कैलास भोसले (२६) व एका महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 208.950 Mg मेफेड्रोन आणि 5.550 Mg कोकेन किमतीचे 44,11,00 रुपये जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास केला असता हे ड्रग्ज धानोरी येथील अन्य एका आरोपीने पुरवल्याचे उघड झाले. त्यानुसार, पोलीस पथकाने अजितसिंग इंद्रजीतसिंग भवानिया (वय 40) आणि इमरीन गॅरी ग्रीन (37) या आणखी दोन आरोपींना अटक केली. पोलिसांना त्यांच्या ताब्यात 4 ग्रॅम कॉनकेन आणि 2.48 लाख रुपये किंमतीची 61 ग्रॅम चरस सापडली. या प्रकरणातील अधिक तपासासाठी अटक आरोपींना मुंढवा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.