Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रड्रग्ज माफिया ललित पाटीलला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी… ललित पाटीलच्या जीवाला पुणे...

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी… ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका वकिलांचा दावा

ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पुणे पोलिसांची कोठडी मिळाली आहे. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला.

पुणे पोलिसांकडून ललित पाटीलच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटीलच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. ललित पाटील ससुन रुग्णालयात असताना त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा ललितच्या वकिलांनी दावा केला.तसेच ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आला.

पुणे पोलिसांनी आज आर्थर रोड कारागृहातून ललित पाटीलचा ताबा घेतला. ललित पाटील याच्यासह शिवाजी शिंदे आणि रोहित कुमार चौधरी हे आरोपी देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटीलने पलायन केले होते. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याला बेंगळुरुवर अटक केली होती.

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरू आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं होते. ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते. आता ललित ताब्यात आल्याने पुणे पोलीस त्याची सखोल चौकशी करणार आहेत. ललित विरोधात पुण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करण्याऱ्यांच्या संख्येत रोज भर पडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments