Tuesday, December 5, 2023
Homeगुन्हेगारी‘डीआरडीओ’ चे संचालक प्रदीप कुरुलकरांना आज पुण्यातील न्यायालयात हजर करणार..

‘डीआरडीओ’ चे संचालक प्रदीप कुरुलकरांना आज पुण्यातील न्यायालयात हजर करणार..

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत सोमवारी (१५ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पाकिस्तानाला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कुरुलकर यांना सोमवारपर्यंत (१५ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर दिला होता. कुरुलकर यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे. एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून,याबाबतचा अहवाल एटीएसने न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने कुरुलकर यांना १५ मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments