पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग आराखडा प्रसिध्द झाला आहे . तसेच महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि आठ क्षेत्रीय कार्यालयांत प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे प्रसिध्द केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नकाशे महानगर पालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन https://www.pcmcindia.gov.in पाहू शकता .
पालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालय व महापालिका भवनात सर्व ४६ प्रभागांचा एकत्रित नकाशा, सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे व त्यात समाविष्ट असलेला भाग व त्याच्या चतु:सीमेची माहिती असलेले फलक व राजपत्र लावले जाणार आहेत.