Saturday, April 11, 2026
Homeताजी बातमीमहापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी गुरुवारी (दि.६) प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र तो कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.४) अचानक बदलला आहे. आता, प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांसह माजी नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मतदार यादी सुधारणा करा, दुबार व मृत मतदारांची नावे वगळा. त्यानंतरच महापालिका निवडणुका घ्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहे. त्या मागणीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक नऊ दिवसांनी पुढे ढकलले आहे.

आता प्रभागनिहाय मतदार यादी ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर सूचना व हरकती २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ९ दिवस स्वीकारल्या जाणाऱ्या आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणाची यादी ८ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचा सूचना निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments