Sunday, April 19, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी-चिंचवड शाखेच्या इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची निवड

पिंपरी-चिंचवड शाखेच्या इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची निवड

पिंपरी-चिंचवड : इंडियन डेंटल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड), पुणे शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल नियोवूड्स, वाल्हेकरवाडी येथे ११ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली. या सभेत २०२६ सालासाठीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारणीमध्ये डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच सचिवपदी डॉ. गौरव विसपुते, तर खजिनदारपदी डॉ. दिपाली पाटेकर यांची निवड झाली.

डॉ. विनायक कुमार शेट्टी हे मूळचे केंजूर, तालुका उडपी (कर्नाटक) येथील सुशिक्षित कुटुंबातील असून श्री. आणि सौ. केंजूर भास्कर शेट्टी यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी दंत वैद्यकीय शिक्षण मंगळूर येथील के.वी.जी. डेंटल कॉलेजमधून पूर्ण केले.

सन २००२ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम सरकारी रुग्णालयात दंतवैद्यकीय सेवेला सुरुवात केल्यानंतर, गेली २३ वर्षे त्यांनी दंत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा तसेच सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे.

नवीन कार्यकारणी निवडीनंतर दंतसेवा व समाजोपयोगी उपक्रमांची दिशा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments