Wednesday, July 15, 2026
Homeउद्योगजगतडॉ.पी. डी. पाटील यांची महाराष्ट्र साहित्य परिषदच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल, मसाप...

डॉ.पी. डी. पाटील यांची महाराष्ट्र साहित्य परिषदच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल, मसाप पिंपरी चिंचवड तर्फे सत्कार

१८ ऑगस्ट २०२१,
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ चे कुलपती डॉ.पी. डी. याची महाराष्ट्र साहित्य परिषदच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राजन लाखे म्हणाले मसापला ११४ वर्षाची ऐतिहासिक परम्परा आहे. साहित्याची जाण असणारे, साहित्यिकांचा सन्मान करणारे डॉ. पी. डी. पाटील यांची मसापच्या विश्वस्तपदी झालेल्या निवडीमुळे खरे तर मसापची उंची वाढली आहे आणि याचा पिंपरी चिंचवड मधील प्रत्येक साहित्यिकाला आभिमान वाटेल यात शंका नाही. यावेळी मकरंद बापट, अविनाश कांबीकर, डॉ. मीनल लाड यांनीही मनोगत व्यक्त केले तर दत्तू ठोकळे, दीपक अमोलिक यांनी डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयाची आपत्कालीन परिस्थीतीत कशी मदत झाली याची आठवण सांगितली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले मसाप ही मराठी भाषेची मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेवर विश्वस्त पदी झालेली निवड माझ्या दृष्टीने खूप आनंददायी आहे तसेच या संस्थेवर कार्य करण्याची मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असेल. पुढे ते म्हणाले पिंपरी चिंचवड शहरात ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य समेलंन यशस्वी करण्यामध्ये मसाप पिं. चिं. शाखा तसेच पिंपरी चिंचवड मधील तमाम साहित्यिक व रसिकांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे माझे येथील शाखेला नेहमीच सहकार्य असेल हे त्यांनी नम्रतेने नमुद केले.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कोषाध्यक्ष विजय नाईक तसेच मकरंद बापट, माधुरी मंगरूळकर, दीपक अमोलिक, दत्तू ठोकळे, मंगला पाटसकर डी. बी. शिंदे, डॉ. मिनल लाड, जयश्री श्रिखंड़े, अविनाश कांबीकर व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments