Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीडॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे बाणेर, पुणे आणि अहिल्यानगर सेंटर चे ध्यानधारणा प्रशिक्षक व १८३ विश्वविक्रम करणारे आणि जगभरात १४३ देशात ८५०० पेक्षा अधिक सेंटरमध्ये प्रशिक्षण देणारे पहिले भारतीय ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांचा भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार केल्याबद्दल अमेरिकेतील बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ॲानररी डॅाक्टरेट देऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गोवा, सी ब्रिज सरोवर पोर्टिको हॅाटेल येथे आयोजित कार्यक्रमात देश, विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच ॲानररी डॅाक्टरेट देऊन गौरव करण्यात आला.

यापूर्वी ही ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना देशात व परदेशात विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये लंडन येथील विविध ८ पुरस्कार, ब्रिटिश पार्लमेंट व ऑक्सफर्ड विद्यालयात ही विशेष सन्मानित करण्यात आलेले आहे. दुबई मध्ये विविध ५, बँकॉक येथे ३, नेपाळ येथे २ पुरस्कार आणि रशिया, स्वित्झर्लंड, मलेशिया, श्रीलंकेमध्ये ही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. हरके यांच्या कार्याची दखल मार्च २०२० मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकाने देखील घेतली होती. 

बी. के. डॉ. दीपक हरके हे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या संस्थेच्या संपर्कात आले. नंतर त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments