महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनद्वारे पुरस्काराचे आयोजन
विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यवसाय, मालक, उद्योजक तसेच उद्यमशीलतेमध्ये अथक परिश्रम करत भरीव कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सत्कार करण्यात आला. आनंद मेडिकलचे डॉ. अनिल संतु काळे यांना यावर्षी (2023) महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन आणि रेड अॅण्ट ब्रॅण्ड प्रमोशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. जुहू, मुंबई येथील हॉटेल हयात सेंट्रीक या ठिकाणी हा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शिवली. यावेळी अर्जुन बिजलानी, युविका चौधरी, आर्या बब्बर, शरद मल्होत्रा, श्रीजिता डे, स्वप्नील जोशी आदींना या पुरस्कार सन्मानित करण्यात आले.