Sunday, February 8, 2026
Homeगुन्हेगारीतळवडे येथील दुहेरी हत्याकांडाने खळबळ:  एक महिला आणी पुरुषाचा मृतदेह आढळला 

तळवडे येथील दुहेरी हत्याकांडाने खळबळ:  एक महिला आणी पुरुषाचा मृतदेह आढळला 

तळवडे आयटी पार्क परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत एका ३० वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुषाचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मृतांची नावे मंगला सूरज टेंभरे (३०, अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५५, अकोला) अशी असून, ते दोघेही तळवडे परिसरात वास्तव्यास होते. सकाळी मृतदेह आढळून येताच नागरिकांनी तत्काळ देहूरोड पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हे प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तपासाच्या चक्राला वेग देत ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. मात्र, या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments