Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना ना दणका, Sensodyne जाहिरात बंद, Naaptol ला भरभक्कम...

ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना ना दणका, Sensodyne जाहिरात बंद, Naaptol ला भरभक्कम दंड

भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात. त्याविरोधात आवाज उठवल्यावर अशा उत्पादकांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येतो. ग्राहकांना आमिष दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्यात येतो. फसवणूक होऊनही ग्राहक साधी तक्रार करत नसल्याने अशा कंपन्यांचे फावते. पण प्रत्येक वेळी असा फंडा कामी येत नाही. दिशाभूल जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकृष्ट करुन त्यांना फसवणाऱ्या Sensodyne आणि Naaptol चे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कान उपटले आहे. अनुचित व्यापार प्रथा दोन्ही उत्पादकांना भोवली आहे. सीसीपीएने नापतोलला दहा लाखांचा दंड ठोठावला तर सेन्सोडाईन उत्पादन करणा-या ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडला सात दिवसांत त्यांची जाहिरात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सेन्सोडाईन टुथपेस्टला जगभरातील दंतवैद्यांनी मान्यता दिल्याचा दावा सदर जाहिरातीत करण्यात आला होता. तर दुसरीकडे नापतोलच्या जाहिराती या दिशाभूल करणा-या असल्याने, त्यांनी अनुचित व्यापार पद्धतींचा वापर केल्याने या ऑनलाईन विक्रेत्याला दणका दिला.

वाढत्या तक्रारी लक्षात घेत स्वतः केली कारवाई
अशा जाहिरातींबद्दल लोकांच्या मनात कुतुहल असले तरी, फेकाफेकी करणा-या जाहिरातींविरोधात ग्राहक नाराजीचा सूर आळवतातच. अशा प्रकरणांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेतली आणि निकाल दिला. सीसीपीएने जीएसकेला आदेश निघाल्यानंतर सात दिवसांच्या आत देशभरातील सर्व जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 2 (28) अन्वये Sensodyne Toothpaste ची जाहिरात ही ‘दिशाभूल करणारी जाहिरात’ मानली गेली आहे. सीसीपीएने महासंचालकांना 15 दिवसांत ‘रेकमेंडेड बाय डेंटिस्ट वर्ल्डवाइड’, ‘वर्ल्ड्स नंबर १ सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट’ या दाव्यांची खातरजमा करण्यास सांगितले आहे.

काय कंपनीचे म्हणणेः
जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअरच्या प्रवक्त्याने (GSK Consumer Healthcare) सांगितले की, ” त्यांना सीसीपीएचे आदेश मिळाले आहेत. आमची जाहीरात संबंधित कायदे आणि उद्योग मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत आहे, हे आम्ही स्पष्ट करतो. आम्ही जबाबदार कंपनी असून नियमांचे पालन करतो. आम्ही कर्मचा-यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत.’

नापतोलला दंड
सीसीपीए नापतोल ऑनलाइन शॉपिंगनेही लिमिटेडला ही भ्रामक जाहिरातींचे प्रसारण केल्याबद्दल दणका दिला आहे. नापतोलला सीसीपीएने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे, पीटीआयने याविषयी वृत्त दिले आहे. प्राधिकरणाने ‘सेट ऑफ २ गोल्ड ज्वेलरी’, ‘मॅग्नेटिक नी स्पोर्ट’ आणि ‘अॅक्युप्रेशर योग स्लीपर्स’च्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगत नापतोलला या जाहिराती त्वरीत बंद करण्यास सांगतिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments