Saturday, March 22, 2025
Homeगुन्हेगारीअभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल, पत्नीने केले मारहाणीचे आरोप

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल, पत्नीने केले मारहाणीचे आरोप

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे यांच्यावर पत्नी स्नेहाने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments