Monday, May 12, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक! लैंगिक संबंधांला नकार दिल्याने हत्या, डोंबिवलीतील घटना

धक्कादायक! लैंगिक संबंधांला नकार दिल्याने हत्या, डोंबिवलीतील घटना

डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येने खळबळ उडाली होती. यातच आता याचे कारण समोर आले आहे. कामगाराने दुकानदाराच्या पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र महिलेने त्याची निर्लज्ज मागणी धुडकावत पतीकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या कामगाराने दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या केली.

मानपाडा पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी गुड्डू कुमार उर्फ ​​रंजनला अटक केली आहे. आरोपी गुड्डू कुमार डोंबिवलीतील किराणा दुकानात काम करत होता.

रविवारी संध्याकाळी दुकानाच्या मालकाने त्याला जेवणासाठी घरी बोलावलं. तेव्हा दुकान मालक राजेश गुप्ता कामानिमित्त त्याला घराबाहेर जावं लागलं. त्यावेळी मालकाच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत गुड्डूने दुकानदाराच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिने त्याची मागणी धुडकावत आपल्या पतीकडे याविषयी तक्रार करण्याची धमकी दिली.

यावर आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी एका झोपडपट्टीवर धाड टाकून गुड्डू कुमारला ताब्यात घेतलं. पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत गुड्डूने गुन्ह्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments