Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीआमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट…!१५ वर्षांपूर्वी अडकले होते लग्न बंधनात

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट…!१५ वर्षांपूर्वी अडकले होते लग्न बंधनात

३ जूलै २०२१,
बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत . दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे.

आमिर आणि किरणने स्टेटमेंट जारी करत विभक्त होत असल्याची माहिती दिलीय. या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले आहेत,” १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असं आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले, “मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार” असं म्हणत आमिर आणि करणने चाहत्यांकडे देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद मागितले आहेत.

2005 मध्ये विवाहबंधनात; लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments