प्रत्येक खेळाडू हा आपल्या शहराच्या वैभवात भर घालत असतो. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालून या खेळाडूंनी शहराच्या नावलौकिकात अधिक भर घालावी असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन पुणे यांचे मान्यतेने आणि सी.टी.ओ. कार्यालय यांच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या काळात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, नगरसदस्य विलास मडिगेरी, नगरसदस्या आरती चौंधे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, रविंद्र कांबळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना रोख बक्षिस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र महापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर सहभागी खेळाडूंना देखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून परबत कुंभार आणि संतोष ढोरे यांनी काम पाहिले.
विजयी स्पर्धक – १८ ते ४४ वर्षे वयोगट – पुरुष एकेरी – सौरभ राय (प्रथम), अंकित सिंग (द्वितीय).
पुरुष दुहेरी – अजय नागवडे, शशीकांत रुगे (प्रथम), सौरभ राय, अंकित सिंग (द्वितीय).
महिला एकेरी – तपस्या लांडगे (प्रथम), मनिषा खेडकर (द्वितीय).
४५ वर्षे वयापुढील – पुरुष एकेरी – सुश्रीश टोकनेकर (प्रथम), रमेश गोलांडे (द्वितीय).
पुरुष दुहेरी – धनंजय तोडमल, विवेक श्रीवास्तव (प्रथम), अमित पाटील, संतोष ढोरे (द्वितीय).
आज झालेल्या अंतिम सामन्यांचे निकाल –
१८ ते ४४ वर्षे वयोगट – पुरुष एकेरी – सौरभ राय विरुध्द अंकित सिंग – (२१-१५, २१-१५).
पुरुष दुहेरी – अजय नागवडे, शशीकांत रुगे विरुध्द अंकित सिंग, सौरभ राय – (२१-१९, २१-१९)
महिला एकेरी – तपस्या लांडगे विरुध्द मनिषा खेडकर – (२१-९, २१-४).
४५ वर्षे वयापुढील – पुरुष एकेरी – सुश्रीश टोकणेकर विरुध्द रमेश गोलांडे – (२१-१९, २१-१६).
पुरुष दुहेरी – धनंजय तोडमल, विवेक श्रीवास्तव विरुध्द अमित पाटील, संतोष ढोरे – (२१-१३, २१-१३).
जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धा २०२१ या स्पर्धेसाठी मानद सचिव रणजीत नातू, मानद सह सचिव राजीव जाधव, पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन पुणे आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांचे सहकार्य लाभले.