आ. श्रीकांत भारतीय यांच्याबरोबर वार्तालापाचा कार्यक्रम
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकहितवादी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव आ. श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण मंगळवारी (दि. ४ जुलै) दुपारी ३:३० वाजता, हॉटेल कलासागर, कासारवाडी, पुणे मुंबई महामार्ग येथे होणार आहे.
पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि ज्येष्ठ साहित्यिक वि. रा. मिश्रा यांना लोकहितवादी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या कार्यक्रमा नंतर ४:३० वा. आ. श्रीकांत भारतीय यांचे बरोबर सध्याच्या राजकीय घडामोडीवर वार्तालापाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के आणि मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव जेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी केले आहे.