कोरोना कालावधीमध्ये मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये महानगरपालिका सहभागी असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूमुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रक्कमेचा धनादेश महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
यावेळी २६ महापालिका मयत कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ६ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी प्रास्ताविक केले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी मनोगत व्यक्त केले. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.