Saturday, March 22, 2025
Homeगुन्हेगारीरिक्षातील प्रवासी महिलेकडे पाहून घृणास्पद प्रकार करणाऱ्याला अटक, पिंपरी-चिंचवड मधील घटना…

रिक्षातील प्रवासी महिलेकडे पाहून घृणास्पद प्रकार करणाऱ्याला अटक, पिंपरी-चिंचवड मधील घटना…

७ एप्रिल २०२१,
पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडे पाहून सहप्रवाशाने हस्तमैथून केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला आपल्या लहान मुलाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात रिक्षातून घेऊन जात असताना हा प्रकार घडला. सोहेब इक्बाल कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे.

पीडित महिला मोरवाडी येथून शेअरिंग रिक्षातून आपल्या लहान मुलाला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रिक्षात बसलेली व्यक्ती आपल्याकडे बघून अश्लील कृत्य करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर रिक्षा वायसीएम रुग्णालयाजवळ पोहोचताच महिला रिक्षातून उतरली आणि तिने आवारातच असलेल्या पोलिस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली, नंतर तातडीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. ‘रिक्षातून उतरताच महिलेने तातडीने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलिस चौकीत धाव घेतली आणि पोलिसांना आरोपीबाबत सतर्क केलं. लगेच स्थानिकांच्या मदतीने आरोपी सोहेब इक्बाल कुरेशी याला अटक करण्यात आली’, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments