जगात काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका अद्यापही कायम आहे. अनेक देशात कोरोनाचे नववने व्हेरिएंट समोर आले असून यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशातच तज्ज्ञांनी एका नव्या आजाराची भीती व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सातपट जास्त धोकादायक असल्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे जवळपास 5 कोटी लोकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने या आजाराला डिजीज एक्स (Disease X) असं नाव दिलं आहे.
![](https://news14live.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-14-at-2.05.54-PM-4-1024x1024.jpeg)
तज्ज्ञांनी व्यक्त केला धोका
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने डिसिज एक्स हा आजार कोविड-19 पेक्षा जास्त भयानक असल्याचं म्हटलं आहे. या आजाराचा फैलाव झाल्यास जवळपास पाच कोटी लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यता आली आहे. या आजाराचा सामना करणं आव्हानात्मक असल्याचंही WHO ने म्हटलं आहे.