Tuesday, April 21, 2026
Homeआरोग्यविषयकनिगडीतील अण्णा भाऊ साठे स्मारकासमोर सांडपाणी-घाणीचे साम्राज्य, महापालिकेचे दुर्लक्ष 

निगडीतील अण्णा भाऊ साठे स्मारकासमोर सांडपाणी-घाणीचे साम्राज्य, महापालिकेचे दुर्लक्ष 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील निगडी येथे असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोरील परिसरात सध्या सांडपाणी व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्मारकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात साचलेले सांडपाणी आणि कचरा यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान परिसरात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. त्याचप्रमाणे उद्यानासमोरील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला बहुजन समाजातील नागरिक आणि चाहत्यांकडून नियमित भेट दिली जाते. मात्र स्मारकाकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या ऐतिहासिक स्मारकाच्या परिसराची दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संबंधित ठिकाणी तात्काळ स्वच्छता करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करून स्वच्छता न केल्यास शिवशाही व्यापारी संघ आणि सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश समन्वयक युवराज दाखले यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments