मुंबईमध्ये कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संजय लीला भन्साळी हे गंगूबाई काठियावाडीचे चित्रीकरण करत होते.
“संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला कॉरन्टाईन केले आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर दोघांनाही करोनाची लागण झाली आहे. आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने ही करोनाची चाचणी केली आहे.” अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
सुत्राने दिलेल्या माहिती नुसार भन्साळी यांच्या आई लीला भन्साळी सुखरूप आहेत. “संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्या नंतर, त्यांनी लगेच त्यांच्या आईचीही चाचणी केली. मात्र त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तरी देखील त्यानी स्वत: ला कॉरन्टाईन केले आहे.