Wednesday, February 11, 2026
Homeताजी बातमीसूर्य आहे पेरला या गझल संग्रहाचे दिमाखात प्रकाशन

सूर्य आहे पेरला या गझल संग्रहाचे दिमाखात प्रकाशन

‘गझल ही विविध अनुभवांचा, निरीक्षणांचा, जाणिवांचा अर्क असते. गझल माणसाच्या मनाचे प्रतिबिंब असते. गझलकाराच्या स्वभाव आणि विचारांचे शब्दरुप चित्र म्हणजे गझल. दिनेश भोसले यांची गझल ही अशीच अनुभवातून, अगदी हृदयाच्या खोल तळातून आलेली विचार गझल आहे’ असे मत भाष्यकार, समीक्षक, गझलकार संजय गोरडे यांनी गझलकार दिनेश भोसले यांच्या ‘सूर्य आहे पेरला’ या पहिल्या मराठी गझल संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मांडले तर ‘पिंपरी चिंचवड मधील सध्याचे गझलेचे वातावरण व गझलकारांचा वावर पाहता ही उद्योग नगरी आता गझल नगरी म्हणून ही ओळखली जाईल’ असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अविनाश सांगोलेकर यांनी मांडले.

निगडी येथील सावरकर सदन मधील कॅप्टन कदम सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी गझलसंग्रहाचे प्रकाशन डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे व श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगांव संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद जगताप यांनी दिनेश भोसले यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात बहारदार गझल मुशायऱ्याने झाली. मुशायऱ्याचे शमा प्रज्वलन नंदकुमार मुरडे, बाळू वाघमारे यांनी केले. यामध्ये प्रदीप तळेकर,‌मीना शिंदे, सुहास घुमरे, गणेश भुते, अविनाश घोंगटे, आदेश कोळेकर यांनी एक से बढकर एक गझला सादर केल्या तर संदीप जाधव, अभिजीत काळे, सारिका माकोडे, प्रशांत पोरे, निलेश शेंबेकर यांनी दिनेश भोसले यांच्या गझला सादर केल्या. याप्रसंगी सुरत, सोलापूर, बार्शी, वैराग, इंदापूर, नाशिक, करमाळा, हडपसर, पुणे, तळेगांव, पिंपरी चिंचवड मधील साहित्यिक, गझलकार , रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रमोद खराडे, पुनम भोसले, दिनेश भोसले, अविनाश सांगोलेकर, हेमंत गडसिंग (सहसचिव, श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगांव), प्रमोद जगताप, संजय गोरडे स्टेजवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गझलपुष्प संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी केले. मुशायऱ्याचे निवेदन हेमंत जोशी तर प्रकाशन सोहळ्याचे निवेदन प्रशांत पोरे यांनी केले. संयोजनात संजय खोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सोहळ्यास श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, शोभा जोशी, सुबोध गलांडे, सुभाष तिकटे, बुवा साहेब पाटील, नंदीन सरीन, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments