Wednesday, May 20, 2026
Homeक्रिडाविश्वदिलीप वेंगसरकर ह्यांचे क्रिकेटसाठी खूप मोठे आणि अतुलनीय योगदान- तरन जैन

दिलीप वेंगसरकर ह्यांचे क्रिकेटसाठी खूप मोठे आणि अतुलनीय योगदान- तरन जैन

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित U17 व्हेरॉक कप स्पर्धेच्या उदघाटनाच्या निमित्ताने व्हेरॉक इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तरन जैन ह्यांनी थेरगाव येथील अकॅडमीस भेट दिली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांनी त्यांचे स्वागत केले आणि अकॅडमीच्या वाटचालींबद्दल माहिती दिली,उभय संघातील खेळाडूंशी परिचय करून दिला. ह्यावेळी तरन जैन म्हणाले की अकॅडमीच्या राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारणाऱ्या उच्च दर्जाचे क्रिकेटपटू घडविण्यासाठी दिलिप वेंगसरकर ह्यांनी दिलेल्या योगदानाची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या यशस्वी घोडदौडीला सलाम , त्याचबरोबर त्यांनी अकॅडमीमध्ये असलेल्या सोईसुविधा,आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या आणि एकूणच यंत्रणेबद्दल समाधान व्यक्त केले.

ह्या समारंभास अकॅडमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, मोहन जाधव,भूषण सुर्यवंशी आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते,स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत, उदघाटनाचा साखळी सामना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध एच के बाऊन्स अकॅडमी असा झाला यामध्ये व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा संघ विजयी झाला. सामनावीर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा ओम खटावकर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments