पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध सुवर्ण पेढी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चा ५४ वा वर्धापदिन काल उत्साहात पार पडला.या वेळी पिंपर-चिंचवड च्या प्रसिद्ध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. भाऊसाहेब भोईर,नाना (विठ्ल) काटे, राजेंद्र तानाजी गावडे, अपर्णा ताई डोके, जयश्री ताई गावडे, अभय भोर, अनिल झोपे, रमेशशेठ कोरे , हरीश माने, राहुल शेठ कलाटे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित व्यक्तींचे श्री.दिलीप सोनिगरा यांनी यावेळी स्वागत केले व सर्वाचे आभार मानले.

यावेळी त्यांनी सांगितेले की वर्धापन दिनाच्या निमित्ताने २५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आले आहेत.या कालावधीत ग्राहकांना सोने खरेदीवर चांदी अगदी मोफत दिली जाणार आहे, यात तुम्ही जेवढ्या वजनाचे सोने खरेदी करणार तेवढी चांदी मोफत मिळणार आहे आणि ही दिलीप सोनिगरा ज्वेलर्स च्या चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी व कामशेत या सर्व शाखामध्ये उपलब्ध आहे.सोन्या चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दगिन्यातील नावीन्य व ग्राहकांशी असलेलं अतूट नाते हे १९६९ सालापासून जपत आले आहेत.