पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील प्रतिष्ठित नाव असलेल्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने (Dilip Sonigara Jewellers) चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. फक्त चिंचवड शाखेसाठी मर्यादित असलेल्या या योजनेत एक तोळा दागिने खरेदीवर तब्बल दोन हजार रुपये सूट मिळणार आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत लागू असेल.
या विशेष योजनेचा लाभ घेताना ग्राहकांना विविध व्हरायटीचे दागिने, कमी वजनापासून सुरू होणाऱ्या सुंदर अलंकार शृंखला आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटला अनुकूल पर्याय उपलब्ध असतील. तसेच चांदीच्या भेटवस्तू, कलात्मक नक्षीकाम असलेले दागिने देखील ग्राहकांना येथे पाहता आणि खरेदी करता येतील.
दिलीप सोनिगरा ज्वेलर्स : विश्वास आणि उत्कृष्टतेचा वारसा
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये छोट्या दुकानापासून सुरू झालेल्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्स (DSJ) ने अल्पावधीतच ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. उत्कृष्ट दागिन्यांची निवड, सौंदर्य आणि ग्राहक सेवा यामध्ये सातत्य राखत DSJ ने यशाच्या नव्या उंचीवर झेप घेतली आहे. पिढ्यान् पिढ्या स्त्रियांचे दागिन्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगून DSJ आपल्या ग्राहकांना उच्च प्रतीचे दागिने प्रदान करत आहे.
DSJ चा दैदिप्यमान विस्तार
ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे चिंचवडगाव, हिंजवडी, चाकण, रहाटणी, तळेगाव आणि अन्य ठिकाणी DSJ ची ८ शाखा कार्यरत आहेत. वेडिंग ज्वेलरी, टेंपल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सिल्वर कलेक्शन ते उच्च प्रतीच्या डायमंड ज्वेलरीपर्यंत DSJ ग्राहकांना नवनवीन अलंकार उपलब्ध करून देत आहे.
दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक दिलीप सोनिगरा म्हणाले, “हिरे आणि सोन्याचे दागिने केवळ सौंदर्याचा प्रतीक नसून समृद्धी आणिवारशाचा एक भाग आहेत. ग्राहकांना ही खास ऑफर देताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या अपेक्षा ओलांडण्याचा आमचा नेहमीचप्रयत्न राहील.”
ही अप्रतिम संधी हुकवू नका! २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत चिंचवड शाखेला भेट द्या आणि या खास ऑफरचा लाभ घ्या.