Monday, July 20, 2026
Homeताजी बातमीपुण्यात पहिल्यांदाच लोकसंख्या दर्शक घड्याळ (डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक) …

पुण्यात पहिल्यांदाच लोकसंख्या दर्शक घड्याळ (डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक) …

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत स्थापना

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ लोकसंख्या दर्शक घडय़ाळ (डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक) बसवण्यात आले आहे. गोखले संस्थेत बसवण्यात आलेले लोकसंख्या दर्शक घडय़ाळ राज्यातील दुसरे, तर पुण्यातील पहिलेच आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन केंद्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ४ आणि ५ मार्चला गोखले संस्थेतील काळे सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने ४ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात लोकसंख्या दर्शक घडय़ाळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेला निती आयोगाचे उपाध्यक्ष आणि गोखले संस्थेचे कुलपती राजीव कुमार, संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाच्या महासंचालक संध्या कृष्णमूर्ती उपस्थित राहणार आहेत. या पूर्वी मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स येथे लोकसंख्या दर्शक घडय़ाळ बसवण्यात आले आहे. या घडय़ाळाद्वारे देशाची लोकसंख्या दर्शवली जाते.

पुण्यात प्रथमच लोकसंख्या दर्शक घडय़ाळ बसवण्यात आले आहे. गोखले संस्थेत लोकसंख्या संशोधन केंद्र आहे. केंद्र सरकारच्या लोकसंख्या आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांसाठी हे केंद्र काम करते. त्या अंतर्गत लोकसंख्या दर्शक घडय़ाळ बसवण्यात येत आहे. या घडय़ाळाद्वारे देशाची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या दर्शवली जाईल
.– प्रा. विनी सिवानंदन, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments