Friday, September 29, 2023
Homeगुन्हेगारीपिंपरी-चिंचवडमधील दिघी दोन गटात तुफान हाणामारी; कोयते आणि सिमेंटच्या गट्टूने केली मारहाण

पिंपरी-चिंचवडमधील दिघी दोन गटात तुफान हाणामारी; कोयते आणि सिमेंटच्या गट्टूने केली मारहाण

पिंपरी-चिंचवडमधील दिघी दोन गटात तुफान हाणामारी झाली असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कोयते आणि सिमेंटचे गट्टू घेऊन आरोपी एकमेकांवर तुटून पडले होते. या घटनेत प्रज्वल मकेश्वर, ओंकार गाडेकर हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण २० जणांवर खुनाचा प्रयत्न आणि मारामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ कुंडलिक मकेश्वर यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवडमधील दिघीपिंपरी-चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कोयते आणि सिमेंटचे गट्टू घेऊन आरोपी एकमेकांवर तुटून पडले होते. या घटनेत प्रज्वल मकेश्वर, ओंकार गाडेकर हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण २० जणांवर खुनाचा प्रयत्न आणि मारामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ कुंडलिक मकेश्वर यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर बडगे, देवा सुतार, शिवा भेंडेकर, मयूर मानकर, अजय देवरस, आकाश नाईक, दिलीप हांगे, तेजस गालफाडे, शिवा अटकलवाड, माऊली डहाळे, प्रकाश काळे, राकेश काळे, श्याम विटकर, सागर खिलारे, सोन्या गुटकुले, आकाश भेंडकेर, मयूर पाटोळे, ओमकार पाटोळे, हणू कांबळे, हरी पांचाळ आणि प्रसाद कोल्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी प्रसाद कोल्हे याने दिघी रोडवर एस.पी नावाचे कॅफे उघडले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी रात्री होते, उद्घाटन असल्याने साउंड, लायटिंग करण्यात आली होती. दरम्यान, प्रसाद प्रसाद कोल्हेचे दोन्ही गटातील आरोपी हे मित्र असल्याने त्यांना बोलावले होते, पैकी प्रज्वल आणि ओंकार हे त्याच्या साथीदारांसह नाचत होते. तेव्हा, ज्ञानेश्वर बडगेने त्याच्या साथीदारांसह त्या दोघांना सोबत आणलेले कोयते आणि सिमेंटचे गट्टू घेऊन यांना मारहाण केली. तर, त्या दोघांच्या गटाने देखील मारहाण केली असं पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत दोन्ही गटातील आरोपी समोरासमोर आले होते. या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments