Monday, October 7, 2024
Homeउद्योगजगततेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात धेनूचा डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात धेनूचा डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, धाराशिव व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व युवक युवतीही ऑनलाईन सहभागी झाले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा होता की, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबरच डिजिटल उद्योजकता समजावी व आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे डिजिटली उद्योग, व्यवसाय करता यावा, या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि या कंपनीने सुशिक्षित बेरोजगार, तरुणांना तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे डिजी मार्ट मॉडेल विकसित केले आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना डिजिटली दर्जेदार वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे डिजी मार्ट मॉडेल अधिक फायदेशीर ठरले आहे. या डिजी मार्टच्या माध्यमातून कित्येक ग्रामीण भागातील तरुण युवकांना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत.

या डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते पार पडले तसेच डिजिटल उद्योजकता या कार्यक्रमादरम्यान, डिजिटल व्यवसाय व संधी, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्रमोशन, तसेच डिजिटल बिजनेस स्ट्रॅटेजी, रोजगार निर्मितीचे धेनू डिजि मार्ट मॉडेल यासारख्या विविध विषयावर श्री. अमित काळे, श्री. दिनेश खलाटे, श्री. प्रतीक काटकर, श्री. ज्ञानेश्वर काशीद श्री. उदयसिंह दळवी, तसेच धेनू कंपनीचे कार्यकारी संचालक, श्री. संतोष खवळे व डिजिटल बिजनेस मॅनेजर श्री. नितीन पिसाळ इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमादरम्यान डिजिटल उद्योजकता या विषयावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अती उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये किंमतीचा मार्ट प्लॅन, ट्रॉफी तसेच सहभाग प्रमाणपत्र हे बक्षीस कार्यक्रमादरम्यान लवकरच वितरित केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. समृद्धी काळे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेनूची सर्व टीम तसेच तेरणा कॉलेज मधील विविध विभागांचे प्राध्यापक तसेच श्री. अशोक जगताप, प्रशिक्षण अधिकारी (टी.पी.ओ) यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments