उद्धव ठाकरेंच्या मनधरणीनंतरही राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. या पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष असलेल्या राहुल कलाटे यांच्यात सामना रंगणार आहे. हा तोच नेता आहे ज्याने २०१९ ला भाजप-शिवसेनेच्या युतीतून बंड केलं आणि खुद्द दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांनाच तगडं आव्हान देत १ लाख १२ हजार मते आपल्या पारड्यात खेचून घेतली. याच नेत्याने आता चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. आयत्यावेळी रिंगणात नाना काटेंना उभं केल्याने मुळचे शिवसैनिक असणारे कलाटे आता बदला घेणार का? राहुल काटे या निवडणुकीत नाना काटे यांना कसे भारी पडणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
“तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको”
“प्रत्येकाचं एकच मत होतं की, राहुल तू लढलं पाहिजे. तू नेत्यांचं ऐकत असताना आमचा अनादर करू नको. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचा आदर करणं मला क्रमप्राप्त होतं. ही लोकभावना आणि पाठिंबा याच्या बळावर मी निवडणुकीला सामोरं जात आहे,” असंही राहुल कलाटेंनी नमूद केलं.