७ नोव्हेंबर २०२०,
भालचंद्र मगदूम मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मगदूम हे मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील गंडहिंग्लज मधील बेळगुंदी येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भालचंद्र मगदूम यांचे आज (शनिवारी) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 50 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, बहिणी असा परिवार आहे
पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयातील भालचंद्र मगदूम उपसंपादक, वार्ताहर म्हणून कार्यरत होते.