Sunday, September 8, 2024
Homeगुन्हेगारीपोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई , 53 गुन्हेगार...

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई , 53 गुन्हेगार तडीपार

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत परिमंडळ एक मधील भोसरी, एमआयडीसी भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी, दिघी, आळंदी, चाकण, महाळुंगे एमआयडीसी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 53 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी असे गुन्हे करणाऱ्या टोळ्या मधील गुन्हेगारांवर अनेकदा अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तरीही हे गुन्हेगार सुधारण्याचे नाव घेत नाहीत, अशा गुन्हेगारांवर आणखी कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सूचना दिल्या होत्या.त्यानुसार उपायुक्त विवेक पाटील यांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

16 ते 18 ऑगस्ट या दोन दिवसात भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांमधील 13 गुन्हेगार तडीपार केले आहेत. टोळी प्रमुख मुसा उर्फ मुसीफ वजीर थोरपे (वय 21), किरण उर्फ किक्या सुरेश डोळस (वय 24), ऋषिकेश उर्फ बंटी संतोष इंगळे (वय 23, तिघे रा. भोसरी). टोळी प्रमुख सागर दीपक वाल्मिकी (वय 20), सैफ आली अहमद रैन (वय 22), ओमकार निळकंठ गायकवाड (वय 23), चार्लस उर्फ बॉबी शेखर पिल्ले (वय 20), ऋतिक कोंडीबा जावीर (वय 22), प्रणव उर्फ सोन्या विनोद कांबळे (वय 20), संकेत उर्फ महाद्या गणेश पवार (वय 20), राहुल उर्फ चिक्या शाम साळवे (वय 22) अक्षय उर्फ जंगल्या राजू भालेराव (वय 26), राम अशोक कांबळे (वय 21, सर्व रा. दापोडी) या गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक अशोक दांगट, पोलीस अंमलदार राजेंद्र राठोड, वसंत दळवी, वैभव येरंडे, नूतन कोंडे, सुकन्या घोलप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments