Monday, May 11, 2026
Homeताजी बातमीशिवेंद्रराजे-शशिकांत शिंदे वादावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदे वादावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

‘माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही’, अशी जाहीर धमकी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो. कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं, ते आपल्यासोबत राहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं. परंतू मला त्याबद्दल काहाही माहिती नाही. त्या धमकीला घाबरण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली आहे.

वाचाः मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार – सुप्रिया सुळे

“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे,” असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments