Wednesday, December 6, 2023
Homeताजी बातमीपशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित.. दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न…!!

पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित.. दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न…!!

दि.१० जुलै २०२३ रोजी पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली होती. या कार्यशाळेद्वारे जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत दुग्धव्यवसायातील नवंतंत्रज्ञान पोहोचावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदेशीर दुग्धव्यवसाय करता यावा तसेच दुग्ध व्यवसायास संबंधित असणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तरपणे माहिती मिळावी हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.

या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ.आशिष लेले संचालक, एनसीएल, डॉ.शितलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, डॉ.पी.डी साबळे, जलनायक, भूगर्भ वैज्ञानिक, डॉ.गणपत दहे रासायनिक वैज्ञानिक, अमेरिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.नितीन मार्कंडेय सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी, डॉ.प्रशांत भड उपायुक्त, पशुसंवर्धन, डॉ.शांताराम गायकवाड महाव्यवस्थापक गोविंद डेअरी, श्री.विनय ओसवाल, संचालक, नाफारी, पुणे, डॉ.किशोर मठपती संचालक, लीलाश्री ए-२ टेक्नॉलॉजी, श्री.रवी घाटे सामाजिक प्रकल्प प्रमुख बीव्हीजी इंडिया, डॉ.संतोष चव्हाण संशोधक, फार्म लॅब, पुणे, श्री.अलेक्स वेलास्को, डिझाईन थिंकिंग तज्ञ व श्री.संतोष खवळे कार्यकारी संचालक, धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि वरीलपैकी या सर्व मान्यवरांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्या दरम्यान व्यावहारिक जीवनात डिझाईन थिंकिंगचे महत्व याबाबतचा अभंग देखील श्री.संतोष खवळे यांनी लिहिलेला अभंगाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना सर्वच मान्यवरांनी दुग्धव्यवसायातील धेनू ॲपच्या नवतंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेऊन धेनू कंपनीचे संचालक श्री.जयवंत दहे यांचे विशेष कौतुक केले.
दहे यांच्या संकल्पनेवर निर्मित केलेल्या धेनू ॲपचे दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान नेमके काय आहे? त्याचा पशुपालक बांधवांना कसा फायदा होऊ शकतो? याबाबत कंपनीचे कार्यकारी संचालक श्री.संतोष खवळे यांनी शेतकरी व पशुपालक बांधवांना थोडक्यात माहिती देऊन धेनू ॲपच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे चित्रफितीद्वारे अधिक महत्व पटवून दिले.

या कार्यशाळेमधून शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसायाबाबत असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व्हावी व दुग्धव्यवसाय वाढवण्याकरिता त्याचा लाभ घेता यावा,
या उद्देशाने पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ.प्रशांत भड, यांनी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती यांनी दिली. त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालक कार्यशाळेला ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या माध्यमातून मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले धेनू कंपनीचे संचालक श्री.जयवंत दहे व श्रीमती. चंद्रकलाताई खवळे यांचा नाफारीचे कार्यकारी संचालक श्री.विनय ओसवाल व पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ.प्रशांत भड यांनी सन्मान केला.

आधुनिक माहिती तंत्रज्ञान व सेवा या चर्चासत्रांमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे संचालक अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले
त्यामध्ये डॉ. प्रशांत पाटील हर्बोटिक्स बायोसायन्सेस श्री. अजित यादव, वेटीना हेल्थकेअर, डॉ.अमोल अडभाई, वेटमोल ॲनिमल हेल्थ, श्री.निलेश शेवते, जे.एन.एस.वेट, श्री.निलेश लगड, एबीएस इंडिया, श्री.उदयसिंह दळवी मल्टी लिंक सेल्स कार्पोरेशन, इ. कंपन्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच श्री.रामनाथ वदक, अवधूत डेअरी फार्म, श्री.दिनेश खलाटे डी.के गोट फार्म यांनी धेनू ॲपच्या तंत्रज्ञानाविषयी झालेल्या फायद्याबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच श्री.तुकाराम म्हेत्रे, टीवेट ॲनिमल हेल्थकेअर, श्री.अभिमन्यू नागवडे, बारामती इकोसिस्टीम डॉ.मनोज वट्टमवार, कारगिल डॉ.हरीश भोंगाडे, बायो फ्युएल प्रा.लि, श्री.आर.बी राजापूरे, सदन फार्मा, श्री.गजानन शिदरडी, सिक्का ऑटोमेशन इत्यादी कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री.संतोष खवळे यांनी केले व अल्पावधीतच हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वीपणे केल्याबद्दल धेनू कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.नितीन पिसाळ व सर्व धेनू टीमचे पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ.प्रशांत भड यांनी विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments